औरंगाबाद- घराला लागलेल्या चानक आगीमध्ये घरामध्ये काम करणाऱ्या तीन महिला पाच बालक आगीत होरपळून जखमी झाले यापैकी दीड वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत झाला ही घटना औरंगाबाद तालुक्यातील शेवगा गावात शुक्रवारी संध्याकाळी घडली.
नूर मोहम्मद
जावेद बेग असे आगीत होरपळून मृत्यू पावलेल्या दीड वर्षीय बालकाचे नाव आहे.
तर जकिरा बी
जावेद बेग वय30 वर्ष, महेक जावेद बेग
वय 8 वर्ष, यास्मिन राजू बेग
28 वर्ष, अनिस बेग राजु
बेग 12 वर्ष, अरमान बेग राजू
बेग 10वर्ष, सुहाना इलियास
बेग9वर्ष, सुरय्या इलियास
बेग 32 वर्ष, (सर्व रा.शेवगा
ता.जि. औरंगाबाद) असे आगीत होरपळून भाजलेल्या महिला आणि बालकांची नावे आहेत.
या बाबत
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शेवगा गावातील जावेद बेग वाहेद बेग यांची गावात पानटपरी
आहेत.त्यांचे भाऊ हे मिस्त्री आहेत.दोघेही सकाळीच कामाला गेले असल्याने घरात
महिला आणि मुलंच होती. संध्याकाळ झाली असल्याने घरातील सर्व महिला रात्रीच्या
स्वयंपाक करण्यास व्यस्त होत्या तर घरातील पाच मुले हे खेळत होती.दरम्यान
संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास
अचानक घरात आग लागली. घरात कापूस असल्याने आगीने रुद्रारुप धारण केले कुणाला काही
कळण्याच्या आतच खेळणारा चिमुकला नूर सह घरातील आठहीजन आगीत होरपळले.पेटलेल्या
अवस्थेतच जकिरा बी या घराबाहेर आल्या त्यांना आग लागल्याचे पाहून गावकऱ्यांनी धाव
घेत घरातील जखमी
महिला मुले यांना गावात मिळेल त्या वाहनामध्ये टाकून रुग्णालयात हलविले. त्यानंतर
सर्व भजलेल्याना शहरातील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान दीड वर्षीय नूरचा
आज पहाटे पावणे साहा वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला. इतरांवर उपचार सुरू आहे. घराला नेमकी आग
कशाने लागली याचे कारण समोर आलेले नाही.मात्र शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा
अंदाज वर्तविण्यात येत आहे.या घटने बाबत करमाड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात
आली असून पुढील तपास हवालदार रमेश धस हे करीत आहेत.
शासनाने आर्थिक
मदत करावी
बेग कुटुंबातील
दोन्ही कर्ता पुरुष हे मोलमजुरी करून घराचा उदरनिर्वाह करीत आहे.मात्र घडलेल्या
दुर्दैवी घटनेने बेग यांच्या घरातील सर्व संसार उपयोगी वस्तू ,पैशे जळून खाक
झाले आहे.घरात एका चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला आणि कुटुंबातील सात जण उपचार घेत
आहे. त्यांच्याकडे उपचाराला देखील पैशे नाहीत त्यामळे या कुटुंबाला शासनाने आर्थिक
मदत जाहीर करावी अशी मागणी उपसरपंच कैलास सुलाने व पोलीस पाटील मिर्झा यांनी केले
आहे.